गोवा एक्स्प्रेसमध्ये टीसीवर प्रवाशाचा हल्ला

बेळगाव जीआरपीकडे तक्रार दाखल; वास्को ते हजरत निजामुद्दीनदरम्यान धावणाऱ्या १२७७९ क्रमांकाच्या गोवा एक्स्प्रेसमध्ये (Goa Express Train) तिकीट तपासनीसावर (टीसी) एका प्रवाशाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा एक्स्प्रेसमध्ये टीसीवर प्रवाशाचा हल्ला

वास्को : वास्को ते हजरत निजामुद्दीनदरम्यान धावणाऱ्या १२७७९ क्रमांकाच्या गोवा एक्स्प्रेसमध्ये (Goa Express Train) तिकीट तपासनीसावर (टीसी) एका प्रवाशाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा एक्स्प्रेस धावत असताना एका प्रवाशाने तिकीट तपासनीसावर हल्ला केला. या घटनेनंतर संबंधित प्रकरणी बेळगाव रेल्वे पोलीस दलाकडे (जीआरपी) तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यावर धावत्या रेल्वेत झालेल्या या हल्ल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा