काणकोण येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; बिहारमधील संशयिताला अटक

राज्यात चार दिवसांत दुसरी घटना; परिसरात संतापाचे वातावरण : राज्यात दोन दिवसांत चार वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराची दुसरी घटना घडली आहे. काणकोण तालुक्यातील (Canacona Taluka) श्रीस्थळ परिसरात चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
काणकोण येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; बिहारमधील संशयिताला अटक

काणकोण :  राज्यात दोन दिवसांत चार वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराची दुसरी घटना घडली आहे. काणकोण तालुक्यातील (Canacona Taluka) श्रीस्थळ परिसरात चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (१० नोव्हेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणी काणकोण पोलिसांनी (Canacona Police station)  बिहारमधील संशयित युवकाला अटक केली आहे.

काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दोन दिवसांपूर्वीच गोव्यात आला होता. तो स्थानिक बेकरीमध्ये काम करत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याला ताब्यात घेतले. पीडित चिमुरडी आणि तिच्या पालकांचे जबाब एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याने संशयिताची ओळख नंतर जाहीर करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात चार दिवसांत चार वर्षांच्या चिमुलीवरील लैंगिक अत्याचाराची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी म्हापसा येथे फुगे विक्रेत्याच्या चार वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी म्हापसा पोलिसांनी धारवाड, कर्नाटक येथील युवकाला अटक केली आहे.

या  घटनांमुळे राज्यात महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा गुन्हेगारांना समाजात राहण्याचा अधिकार नसून त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा यापूर्वीच दिला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा