वागातोर येथे दुचाकीची वीज खांबाला धडक; पुणे येथील फोटोग्राफरचा जागीच मृत्यू

वागातोर येथे पहाटेच्या सुमारास दुचाकीवरील नियंत्रण सुटून वीज खांबाला भीषण धडक बसल्याने पुण्यातील ३० वर्षीय फोटोग्राफर आकाश अडकेकर याचा जागीच मृत्यू झाला. हणजूण पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
वागातोर येथे दुचाकीची वीज खांबाला धडक; पुणे येथील फोटोग्राफरचा जागीच मृत्यू

म्हापसा : वागातोर येथे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबाला धडकल्याने झालेल्या भीषण स्वयंअपघातात पुण्यातील एका फोटोग्राफरचा जागीच मृत्यू झाला. आकाश रामजी अडकेकर (वय ३०, रा. पुणे, महाराष्ट्र) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

हा अपघात गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ च्या सुमारास घडला. आकाश हा वागातोर येथील 'जॉली ज्यूली रिसॉर्ट'कडून 'मँगो ट्री रेस्टॉरंट'च्या दिशेने फॅसिनेटर (Fascino) स्कूटरवरून जात होता. या दरम्यान 'विकिंग' आस्थापनाजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्या कडेला असलेल्या वीज खांबावर जाऊन धडकली.

या अपघातात आकाश गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच हणजूण पोलीस ठाण्याचे साहाय्यक उपनिरीक्षक कृष्णा नाईक व उपनिरीक्षक विराज नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हणजूण पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा
सर्व पहा