‘९/११’ हल्ल्याची पुनरावृत्ती टळली, भारतीय पायलटची जिगरबाज कामगिरी

दुबईहून इस्रायल जाणाऱ्या विमानाचे यशस्वी लँडिंग करत जखमी होऊनही १८० प्रवाशांचा जीव वाचवला.

Story: गोवन वार्ता न्यूज डेस्क |
3 hours ago
‘९/११’ हल्ल्याची पुनरावृत्ती टळली, भारतीय पायलटची जिगरबाज कामगिरी

दुबई : ‘फ्लायदुबई’चे विमान दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जात असताना एक मोठा पेच निर्माण झाला. या विमानाचे अपहरण करून ते क्रॅश करायचा प्रयत्न होता. त्यानुसार एका पायलटने दुसऱ्या पायलटवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. मात्र जखमी झालेल्या पायलटने विमानाचा मार्ग बदलून १८० प्रवाशांचा जीव वाचवला. हा पायलट भारतीय असल्याचे समोर आले आहे.

पायलटने विमानातून आधी इमर्जन्सी कोड आणि त्यांनतर हायजॅकिंगचा संकेत देणारा ७५०० हा कोड पाठवला. त्यामुळे इस्रायलने लढाऊ विमाने पाठवली आणि इस्रायली सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. त्यांनतर विमानाचा मार्ग बदलून सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर ते सुरक्षित उतरवण्यात आले. हे विमान दुबई ते इस्रायल असा प्रवास करत होत. या विमानाचे अपहरण करून क्रॅश करायचा प्रयत्न होता, अशी माहिती समोर येत आहे. मूळचे गुजरातमधील राहणारे पायलट कॅप्टन स्मित मच्छर यांनी हा डाव मोडून काढला आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले आणि प्रवाशांचा जीव वाचवला. 

ज्या पायलटने हल्ला केला तो ओमानी होता. भारतीय पायलटसमोर १८० प्रवाशांचा जीव वाचवणे हे सर्वांत मोठे आव्हान होते. त्याने प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. ज्यामध्ये २८ इस्रायली तरुणांचा समावेश होता. 

९ /११ सारखी घटना घडवण्याचा होता प्रयत्न

हे विमान दुबई ते इस्रायल जात होते. ओमानी पायलटचा विमानाचे अपहरण करायचा प्रयत्न होता. विमानाचे अपहरण करून ते जमिनीवर उतरत असताना क्रॅश करायचे होते. मात्र भारतीय पायलटमुळे ते शक्य झाले नाही. विमानातील काही प्रवाशांचे म्हणणे होते की, विमान हवेत असताना सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग करण्याचे प्रयत्न सुरू होते. विमानात बराच वेळ संघर्ष सुरू होता. विमानाचे लैंडिंग करताना क्रॅश करण्याचाच त्याचा प्रयत्न होता. मात्र ओमानी पायलटचा उद्देश काय होता? याची आता चौकशी केली जात आहे. दुबई ते इस्रायल विमानातील प्रवाशी यांचा जीव भारतीय पायलटने वाचवला.

हेही वाचा
सर्व पहा