पर्यटन हंगामातील पहिल्या चार्टर विमानाचे रशियातून दाबोळी विमानतळावर आगमन

१६२ पर्यटकांचा समावेश; पर्यटकांचे जंगी स्वागत; २०२६-२७ या पर्यटन हंगामातील पहिले चार्टन विमान रशियातील एकातेरिनब्रग येथून गाेव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या विमानात एकूण १६२ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या विमानाच्या आगमनामुळे यंदाच्या पर्यटन हंगामाला अधिकृतरित्या सुरूवात झाली आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
पर्यटन हंगामातील पहिल्या चार्टर विमानाचे रशियातून दाबोळी विमानतळावर आगमन

वास्को : २०२६-२७ या पर्यटन हंगामातील पहिले चार्टन विमान रशियातील एकातेरिनब्रग येथून गाेव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या विमानात एकूण १६२ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे.  या विमानाच्या आगमनामुळे यंदाच्या पर्यटन हंगामाला अधिकृतरित्या सुरूवात झाली आहे.

रशिया हा गोव्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनातील महत्त्वाचा स्रोत मानला जातो. त्यामुळे रशियन शहरांतून सुरू होणाऱ्या चार्टर सेवांकडे पर्यटन क्षेत्राचे लक्ष लागलेले असते. आगामी काळात रशियातून गोव्यात आणखी मोठ्या प्रमाणात चार्टर उड्डाणे सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दाबोळी विमानतळावर पहिल्या चार्टर विमानाचे आगमन झाल्याने गोव्यातील पर्यटन हंगामाला चालना मिळणार आहे. यावर्षी पर्यटनासाठी रशिया तसेच इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा पर्यटन क्षेत्राकडून व्यक्त केली जात आहे.

दाबोळी विमानळावर उतरलेल्या पर्यटकांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शिष्टाचार तथा वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकारिणीचे आकाश दीप तसेच इतरांची उपस्थिती होती. 

गोवा सुरक्ष‌ित पर्यटन स्थळ : मंत्री गुुदिन्हो

जागतिक पातळीवरली घडामोडी पाहता गोवा हे देशी न्‍ विदेशी पर्यटकांसाठी सुरक्ष‌ित पर्यटनस्थळ असल्याचे मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले. रशियातून पहिले चार्टर विमान पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानळावर उतरले आहे. या पर्यटकांचे पारंपारिक पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले. दाबोळी विमानतळ देशी विदेशी पर्यटकांसाठी किती महत्त्वाचा आहे ते दिसून येत आहे. विमानळावर चांगल्या सुविधाही आहेत. त्यासाठी दाबोळी विमानतळाचे अधिकारी आकाश दीप व त्यांचे सहकारी चांगली मेहनत घेत आहेत. देशी विदेशी पर्यटकांचे गोवा हे पसंतीचे पर्यटन स्थळ आहे. गोव्यात त्यांचे स्वागत असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

दरम्यान, गोवा सरकार, पर्यटन खाते तसेच गोवा पर्यटन विकास महामंडळ यावर्षीच्या पर्यटन हंगामासाठी सज्ज होत आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी तसेच चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. पर्यटनाच्या अनुषंगाने वाढणारी गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज होत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा