पर्वरी गोळीबार प्रकरणी आठव्या संशयिताला मुंबईत अटक

गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार मुंबईत जप्त; पर्वरी येथील हॉटेल निओ मॅजेस्टिक परिसरातील गोळीबार प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणातील आठव्या संशयिताला मुंबईतून अटक केली आहे. आणि दोन कार जप्त केल्या आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 mins ago
पर्वरी गोळीबार प्रकरणी आठव्या संशयिताला मुंबईत अटक

पणजी : पर्वरी येथील हॉटेल निओ मॅजेस्टिक परिसरातील गोळीबार प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणातील आठव्या संशयिताला मुंबईतून अटक केली आहे. आणि दोन कार जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव दीनानाथ त्रिलोकी कोरी असे आहे. तो वाहन चालक आहे. 

गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हलवत संबंधित वाहनांचा माग काढला. तपासादरम्यान ही दोन्ही वाहने मुंबईत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी ती ताब्यात घेतली. याप्रकरणातील आठव्या संशयितालाही मुंबईतून अटक करण्यात आली.

आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांच्या हालचाली, वाहनांचा वापर आणि हल्ल्याच्या नियोजनाबाबत महत्त्वाची माहिती मिळवली आहे. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही कार आणि अटक केलेल्या आठव्या संशयिताच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.  पोलीस निरीक्षक महेश गाडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक माधव नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची सूत्रे हलवत संबंधित वरील वाहनांचा माग काढला.

दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी मॅजेस्टिक प्राइड ग्रुपचे संचालक श्रीनिवास नायक हे हॉटेलच्या आवारातून बाहेर पडत असताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात नायक हे सुदैवाने बचावले होते. घटनेनंतर गुन्हे शाखेने तपास हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला होता. याप्रकरणी यापूर्वी सात जणांना अटक केली आहे. आता आठव्या संशयिताला अटक करण्यात आल्याने तपासाला आणखी गती मिळणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा