३१.७ टक्के तुटीसह मान्सून हंगामाची सांगता

बुधवार ३० सप्टेंबर रोजी देशातील मान्सून हंगामाची अधिकृत सांगता झाली. राज्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी ८०.९२ इंच पावसाची नोंद झाली. यंदा पावसाचे प्रमाण ३१.७ टक्क्यांनी कमी आहे. यंदा ‘अल निनो’ प्रणालीमुळे यावर्षी राज्यासह संपूर्ण देशात मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी राहिले. गतवर्षी राज्यात मान्सून हंगामात १२३.३८ इंच पावसाची नोंद झाली होती

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
३१.७ टक्के तुटीसह मान्सून हंगामाची सांगता

पणजी : बुधवार ३० सप्टेंबर रोजी देशातील मान्सून हंगामाची अधिकृत सांगता झाली. राज्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी ८०.९२ इंच पावसाची नोंद झाली. यंदा पावसाचे प्रमाण ३१.७ टक्क्यांनी कमी आहे. यंदा ‘अल निनो’ प्रणालीमुळे यावर्षी राज्यासह संपूर्ण देशात मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी राहिले. गतवर्षी राज्यात मान्सून हंगामात १२३.३८ इंच पावसाची नोंद झाली होती.

हवामान खात्यातर्फे १ जून ते ३० सप्टेंबर हा हंगामी पाऊस समजला जातो. तर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यानच्या पावसाला वार्षिक पाऊस म्हटले जाते. यंदा राज्यात ५ जून रोजी मान्सून गोव्यात दाखल झाला होता. मान्सून केरळमध्ये ३ दिवस उशिरा म्हणजेच ४ जून रोजी दाखल झाला होता. अनुकूल वातावरणामुळे मान्सून केरळ मधून केवळ एका दिवसात गोव्यात दाखल झाला होता. राज्यात पावसाची वार्षिक सरासरी १२९.९२ इंच तर जून ते सप्टेंबर दरम्यानच्या हंगामी सरासरी ११८.४२ इंच आहे.

गोव्यात सर्वाधिक पावसाची नोंद

संपूर्ण देशात मान्सून हंगामात गोव्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यानंतर

सिक्कीममध्ये ७२.११ इंच, ओडिशा मध्ये ५७.१४ इंच तर केरळमध्ये ५१.७ इंच पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने पुढील सहा दिवस राज्यात किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

बुधवारी पणजीत कमाल ३१.८ अंश तर किमान २५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३१ ते ३३ अंश तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा
सर्व पहा