पोस्ट खात्याने स्वतंत्र गोवा सर्कल तयार करावे : जॉन नाझारेथ

स्थानिकांनाच नोकरी द्यावी; टपाल खात्यातर्गंत गोवा राज्य हे महाराष्ट्र सर्कल मध्ये येते. यामुळे खात्याच्या गोव्यामध्ये होणाऱ्या भरतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. यामुळे स्थानिक गोमंतकीयांवर अन्याय होत आहे. यासाठी टपाल खात्याने स्वतंत्र गोवा सर्कल स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच गोव्यातील टपाल खात्यात केवळ स्थानिकांनाच नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी जॉन नाझारेथ यांनी केली.


3 hours ago
पोस्ट खात्याने स्वतंत्र गोवा सर्कल तयार करावे : जॉन नाझारेथ

पणजी : टपाल खात्यातर्गंत गोवा राज्य हे महाराष्ट्र सर्कल मध्ये येते. यामुळे खात्याच्या गोव्यामध्ये होणाऱ्या भरतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. यामुळे स्थानिक गोमंतकीयांवर अन्याय होत आहे. यासाठी टपाल खात्याने स्वतंत्र गोवा सर्कल स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच गोव्यातील टपाल खात्यात केवळ स्थानिकांनाच नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी जॉन नाझारेथ यांनी केली.

शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ॲड. सुरेश पालकर व मारियानो आराउजो व अन्य उपस्थित होते.

नाझारेथ  यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत गोव्यातील टपाल खात्यात महाराष्ट्रातील लोकांची भरती होत आहे. या लोकांना गोव्यातील गावे, येथील लोकांची नावे समजत नाहीत. त्यांना कोकणी भाषा देखील समजत नाही. टपाल खात्याच्या नियमानुसार एखाद्या राज्याची इंग्रजी किंवा हिंदी राजभाषा नसेल तर खात्याच्या कर्मचाऱ्यांना त्या राज्याची राजभाषा समजणे आवश्यक असते. मात्र गोव्यात या नियमाचे पालन होत नाही. आज गोव्यातील अनेक टपाल कार्यालयांमध्ये मराठी, हिंदीमध्ये संवाद केला जात आहे. यामुळे कोकणी भाषा मागे पडत आहे.

ते म्हणाले, या विषयावर आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. गोव्याचे स्वतंत्र सर्कल करण्यासोबतच, कर्मचारी भरतीसाठी १५ वर्षांचा रहिवासी दाखला तसेच कोकणीचे ज्ञान सक्तीचे करावे अशी मागणी आम्ही केली आहे. टपाल भरतीची परीक्षा मराठीतून न करता इंग्रजी भाषेमध्ये करावी. यामध्ये कोकणीसाठी १५ गुणांची स्वतंत्र परीक्षा असावी. राष्ट्रीयकृत बँकांच्या भरतीसाठी देखील हीच प्रक्रिया असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचे योग्य पालन होत आहे का नाही हे पाहण्यासाठी सरकारने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी देखील आम्ही केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा