पणजी : हैद्रराबादहूनआंतरराज्य प्रवासी बसमधूनगोव्यात आणण्यात येत असलेल्यागांजाच्या तस्करीचा गुन्हेशाखेने शुक्रवारी पर्दाफाशकेला. म्हापसा येथीलआंतरराज्य बसस्थानकावरकेलेल्या कारवाईत गुन्हेशाखेने १०.७५४ किलोगांजा जप्त केला. आणिएकाला अटक केली तर एका अल्पवयीनालाताब्यात घेतले. अटककेलेल्याचे नाव गोकुळा जेना(२४ वर्षे, ओडिशा)असे आहे.
गुन्हेशाखेचे निरीक्षक विकास देयकरयांच्या नेतृत्वाखाली हीकारवाई करण्यात आली.
२५सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१९ते रात्री ९.२५ यावेळेत म्हापसा आंतरराज्यबसस्थानक परिसरात ही कारवाईकरण्यात आली. संशयितांकडेखांद्यावरील बॅग आणि हातातीलट्रॉलीमध्ये हिरवट रंगाचेफुलोरे व फळधारी भाग असलेलागांजा लपवून ठेवण्यात आलाहोता. पोलिसांनीतो जप्त करून पडताळणी केल्यानंतरसंशयिताला रीतसर अटक केली.
अटककरण्यात आलेला गोकुळा जेनाहा ओडिशातील बालेश्वर जिल्ह्यातीलरहिवासी आहे. त्यानेअल्पवयीन मुलाचा वापरअमलीपदार्थांची वाहतूक किंवापुरवठा करण्यासाठी केल्याचेप्राथमिक तपासात समोर आलेआहे.
याप्रकरणीसंबंधित कलमांन्वये गुन्हानोंदवण्यात आला आहे. याकारवाईत एएसआय श्रीराम साळगावकर,कृतेश किनळकर (पीसी),रुपेश गायकवाड (पीसी),प्रकाश उतकुरी (पीसी),करिश्मा गुडगेरी(एलपीसी), श्रीकृष्णमाडकर (पीसी)यांनी सहभाग घेतला.
सखोल तपास करण्याचीमागणी
दरम्यान,गोव्यात गांजा जप्तकरण्याची प्रकरणे दिवसेंदिवसवाढ होत आहे. अनेकांनागांजासहीत पकडले जात आहे.गांजासहीत पकडलेल्यांकडूनसविस्तर माहिती घेऊन याप्रकरणातकोण गुंतले आहेत, त्याचासखोल तपास करून पर्दाफाश करावाअशी मागणी जोर धरत आहे.
गांजासहीत सापडलेलेजास्त करून गोव्याबाहेरीलराज्यांतील असतात. त्यांच्याकडूनमाहिती घेऊन याप्रकरणातीलपूर्ण नेटवर्कचा शोध घ्यावा;अशी मागणी होत आहे.


