गोव्यात टॅक्सी ऑपरेटरसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली सुरू करणार : वाहतूकमंत्री गुदिन्हो

वाहतूक विभागाकडून आगामी काळात गोव्यात टॅक्सी ऑपरेटरसाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू करण्याची योजना असल्याची माहिती वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिली. या प्रणालीमुळे टॅक्सी सेवेशी संबंधित माहिती अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 mins ago
गोव्यात टॅक्सी ऑपरेटरसाठी  ‘क्यूआर कोड’ प्रणाली सुरू करणार : वाहतूकमंत्री  गुदिन्हो

वास्को : वाहतूक विभागाकडून आगामी काळात गोव्यात टॅक्सी ऑपरेटरसाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू करण्याची योजना असल्याची माहिती वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिली. या प्रणालीमुळे टॅक्सी सेवेशी संबंधित माहिती अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील सुधारित टॅक्सी भाडेदर संरचनेचे दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूकमंत्री  मॉविन गुदिन्हो यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.  तब्बल पाच वर्षांनंतर टॅक्सी भाडेदरात बदल करण्यात आला आहे. २०२१ मध्ये लागू करण्यात आलेल्या फ्लॅट रेट पद्धतीऐवजी २०२६ साठी सुधारित पॉइंट-टू-पॉइंट तसेच अंतरावर आधारित भाडे पद्धत लागू करण्यात आली आहे.

नव्या भाडे संरचनेत वाहनाच्या प्रकारानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. विशेषतः एसयूव्ही आणि मोठ्या वाहनांसाठी सुधारित दर लागू करण्यात आले आहेत.  या वाहनांच्या आकारमानानुसार तुलनेने अधिक भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील टॅक्सी व्यवसायाला नव्या दररचनेमुळे अधिक स्पष्टता मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दाबोळी विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमॅन असोसिएशनच्या कार्याची दखल घेत गुदिन्हो यांनी संघटनेचे कौतुक केले. सुधारित भाडे संरचनेचा लाभ केवळ दाबोळी विमानतळावरील नव्हे, तर संपूर्ण गोव्यातील टॅक्सी ऑपरेटरना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा
सर्व पहा