गोव्यात आपचे सरकार आल्यास प्रत्येक घराला ३०० युनिट वीज मोफत : अरविंद केजरीवाल

नगरनियोजन कायद्यातील कलम ३९ करणार; गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास महिन्याला प्रत्येक घराला ३०० युनिट वीज मोफत देण्यात येईल. महिलांना बस प्रवास मोफत केला जाईल . प्रत्येक कुटुंबाला देणार १० लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल. प्रत्येक महिलेला महिन्याला ३ हजार रुपये निधी देण्यात येईल. प्रत्येक गावात एक मैदान बांधले जाईल. तसेच नगरनियोजन कायद्यातील कलम ३९ अ रद्द केले जाईल अशा घोषणा पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 mins ago
गोव्यात आपचे सरकार आल्यास प्रत्येक घराला ३०० युनिट वीज मोफत : अरविंद केजरीवाल

पणजी : गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास महिन्याला प्रत्येक घराला ३०० युनिट वीज मोफत देण्यात येईल. महिलांना बस प्रवास मोफत केला जाईल . प्रत्येक कुटुंबाला देणार १० लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल. प्रत्येक महिलेला महिन्याला ३ हजार रुपये निधी देण्यात येईल. प्रत्येक गावात एक मैदान बांधले जाईल. तसेच नगरनियोजन कायद्यातील कलम ३९ अ रद्द केले जाईल अशा घोषणा पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केली.

शुक्रवारी पणजीत झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते.  यावेळी प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार वेंजी व्हिएगस, गोवा प्रभारी आतीशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. केजरीवाल यांनी सांगितले की, गोव्यातील लोकांना आता आपचे सरकार हवे आहे. आज आम्ही येथे सहा वादे करणार आहोत.

सध्या गोव्यात वाढीव वीज बिले येत आहेत. भारनियम वाढले आहे. आपचे सरकार आल्यास घरगुती ग्राहकांचे जुनी थकीत बिले माफ करण्यात येतील. प्रत्येक घराला ३०० युनिट मोफत वीज दिली जाईल. तसेच २४ तास वीज पुरवठा करण्यात येईल. राज्यातील अनेक महिला बस प्रवास करतात. आपचे सरकार आल्यास महिलांना बस प्रवास मोफत केला जाईल.

ते म्हणाले, राज्यात सरकारी इस्पितळांची दुर्दशा झाली आहे. खाजगी इस्पितळात लाखो रुपये बिल येते. आम्ही आमचे सरकार आल्यावर प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा देणार आहोत. यासाठी उत्पन्नाची अट असणार नाही. सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. गोव्यात गृह आधार योजना सुरू आहे. मात्र यातील रक्कम कमी आहे. तसेच याच्या अटी देखील अधिक आहेत. आमचे सरकार आल्यास १८ वर्षांवरील सर्व महिलांना महिन्याला ३ हजार रुपये देण्यात येतील. एकाच कुटुंबातील सर्व महिलांना याचा लाभ मिळेल.

गोव्यातील मुलांना क्रीडा प्रकारांमध्ये रस आहे. गोव्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. मात्र त्यामानाने गोव्यात मैदानांची संख्या कमी आहे. आमचे सरकार आल्यास प्रत्येक गावात तसेच प्रत्येक प्रभागात एक मैदान उभारण्यात येईल.

गोव्यातील पर्यावरण वाचवण्यासाठी आमचे सरकार आल्यावर नगर नियोजन कायद्यातील कलम ३९ अ देखील तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. याआधी दिल्ली आणि पंजाब मध्ये आम्ही आमचे वादे पूर्ण केले आहेत. गोव्यातील जनतेने देखील आपचे सरकार आणून या वाद्यांचा लाभ घ्यावा असे केजरीवाल यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा