थिवीतील व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी मुख्य संशयितासह दोघांना सशर्त जामीन

एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी २०२१ मध्ये शस्त्रांचा धाक दाखवून केले होते अपहरण; थिवी येथील व्यावसायिकाचे २०२१ मध्ये शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बिरेंद्र कुमार आणि सुभाष भोसले या दोघांनाही गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
45 mins ago
थिवीतील व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी  मुख्य संशयितासह दोघांना सशर्त जामीन

पणजी : थिवी येथील व्यावसायिकाचे २०२१ मध्ये शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बिरेंद्र कुमार आणि सुभाष भोसले या दोघांनाही गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

या दोघांनाही प्रत्येकी १ लाख रुपयांची हमी, दर महिन्याला दोन वेळा पोलीस स्थानकात उपस्थिती लावणे, पासपोर्ट पोलिसांकडे सुपूर्द करणे तसेच इतर अटींवर जामीन मंजूर केला. या प्रकरणात न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करणे  बंधनकारक असेल.

२०२१ मध्ये घडलेल्या या अपहरण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, थिवी येथील व्यावसायिकाचे शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणात बिरेंद्र कुमार याला मुख्य संशयित आरोपी म्हणून नमूद करण्यात आले होते.

पाच जणांनी मिळून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला. त्यानंतर अपहरणकर्ते हार्डवेअर दुकानात ग्राहक बनून आत शिरले. दुकानातील रोख रक्कम काढली व नंतर व्यावसायिकाचे अपहरण करून एका अज्ञात ठिकाणी नेऊन ठेवले. आणि त्यांच्या कुटुंबियांना फोन करून खंडणी मागितली असे संशयितांवर आरोप आहेत.

दरम्यान, यासदर्भात माहिती देताना अॅड. रोहन देसाई यांनी सांगितले की, याप्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सुनावणी खूपच सावकाश होत होती. कलम २१ चे उल्लंघन होत होते. जलद सुनावणी होत नव्हती. हे सर्व लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा