जलतरण तलावात बुडून दोन वर्षीय मुलीचा मृत्यू

विलियण भाटी-सांगे येथील घटना

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
20 mins ago
जलतरण तलावात बुडून दोन वर्षीय मुलीचा मृत्यू

सांगे : विलियण भाटी-सांगे येथील एका फार्मवरील जलतरण तलावात बुडून दोन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली. मुलगी तलावाजवळ खेळत असताना तिची आई नवजात बाळाला दूध पाजत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. काही वेळाने कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला असता, ती जलतरण तलावात बुडाल्याचे आढळून आले. तिला तातडीने सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. मुलीच्या मृतदेहाची चिकित्सा करण्यात आली. त्यात बुडल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सांगे पोलिसांनी नोंद केली आहे.