मुरगाव तालुक्यात १० वर्षीय मुलीवर १८ वर्षीय नातेवाईकाचा लैंगिक अत्याचार

मुरगाव पोलिसांकडून ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
56 mins ago
मुरगाव तालुक्यात १० वर्षीय मुलीवर १८ वर्षीय नातेवाईकाचा लैंगिक अत्याचार

वास्को : मुरगाव तालुक्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी १८ वर्षीय नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी पहाटे मुलीच्या आईने आणि कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. आरोपीने जेवण देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर तिला जबरदस्तीने खोलीत नेऊन तिचे तोंड दाबल्याचा आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेत मुलीला शारीरिक दुखापत झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
तक्रारीनंतर मुरगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ६५(२) व ११५(२), गोवा चिल्ड्रन्स अॅक्ट २००३ मधील कलम ८(२), तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यातील कलम ४, ६, ८, १० आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साईदत्त नाईक करीत आहेत. पोलीस निरीक्षक शेरिफ जॅकीस यांच्या देखरेखीखाली तसेच मुरगावचे अधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा