इस्त्रायली नागरिक दुडूला अटक

देशात बेकायदा वास्तव्य प्रकरण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
इस्त्रायली नागरिक दुडूला अटक

म्हापसा : पिकेन पेडे, हणजूण येथे राहणारा इस्रायली नागरिक डेव्हिड ड्रिहम ऊर्फ दुडू (५१) याला व्हिसा व पासपोर्ट सारखे वैध प्रवासी दस्तऐवज नसताना गोव्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली हणजूण पोलिसांनी अटक केली आहे. संशयित दुडू याच्याविरुद्ध राज्यात अनेक ड्रग्ज तस्करीचे गुन्हे नोंद आहेत.

शुक्रवार, २ रोजी सकाळी ११ वाजता ही कारवाई पोलिसांनी केली. संशयित आरोपी दुडू या विदेशी नागरिकाला पोलीस पथकाने पकडले. भारत देशात वास्तव्य करून राहण्यासाठी आवश्यक प्रवासी दस्तावेज असलेले पारपत्र आणि व्हिसा नसल्याचे पोलिसांना तपासणीत आढळून आले. शिवाय त्याच्याजवळील पासपोर्टची मुदत जुलै २०२६ मध्ये संपुष्टात आली होती. त्यानंतर पोलिसांनी इमिग्रेशन अँड फॉरेनर्स एक्ट २०२५’ च्या कलम २३ (अ) चे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर करीत आहेत.