
इस्लामाबाद : पाकिस्तानने (Pakistan) सोमवारी रात्री अफगाणिस्तानावर (Afganistan) परत एकदा हवाई हल्ला (Air Strike) केला.
या हल्ल्यात १० नागरिक मृत्यू पावले. त्यात ९ लहान मुले व एका महिलेचा समावेश आहे.
तालिबान प्रशासनाने या माहितीला दुजोरा दिला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातल्या एका घरावर हल्ला केला.
रात्री सुमारे १२ वाजता पाकिस्तानी विमानांनी गरबज जिल्ह्यातल्या मुगलगई परिसरात एका घरावर बॉंब हल्ला केला. या हल्ल्यात ५ मुलगे, ४ मुली व एका महिला ठार झाली. घर पूर्णपणे उद्धवस्त झाले.
तालिबान प्रवक्त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने कुनार व पक्तिका प्रांतांतही बॉंब टाकले. त्यात ४ नागरिक जखमी झाले. यासंदर्भात पाकिस्तानच्या लष्कराकडून व परराष्ट्र मंत्रालयाकडून अजून कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही.
पाकिस्तानलाही सुरक्षेचे आव्हान
हा हल्ला अशा वेळी झाला की, जेव्हा पाकिस्तान स्वत:च सुरक्षा आव्हानाकडे झुंजतोय. त्यातच संध्याकाळी पाकिस्तानच्या शहरात फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी मुख्यालयावर हल्ला झाला. हे मुख्यालय लष्करी छावणी क्षेत्राजवळ आहे.
अहवाला नुसार, या हल्ल्यात दोन आत्मघाती हल्लेखोरांचा समावेश होता. प्रथम हल्ला केलेल्याने स्वताला गेटजवळ उडवून दिले तर दुसरा कॅम्पसमध्ये घुसला.