परराज्यातील पावसामुळे गोव्यात भाजीपाला महागला

टोमॅटो ८० तर आले १६० रुपये किलो : कांदा-बटाट्याचे दरही कडाडले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th November, 11:54 pm
परराज्यातील पावसामुळे गोव्यात भाजीपाला महागला

पणजी : महाराष्ट्र आणि कर्नाटकात झालेल्या अवकाळी पावसामुळे गोव्यात होणारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. याचा थेट परिणाम पणजी मार्केटमधील दरांवर झाला असून भाज्यांचे दर चांगलेच भडकले आहेत. सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच टोमॅटोचे दर ८० रुपये किलोवर पोहोचले आहेत. पुढील काही दिवस ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

महागाईचा भडका! 🔥

टोमॅटो : ८० रुपये/किलो

लसूण : ३०० ते ३५० रुपये/किलो

मटार : २०० रुपये/किलो

बाजारात बटाटा आणि कांद्याचे दर १० रुपयांनी वाढले असून ते आता ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. वालपापडीचे दर वाढून १२० रुपये, तर ढब्बू मिरची २० रुपयांनी महाग होऊन १२० रुपये किलो झाली आहे.

दरांमध्ये तफावत : खुला बाजार वि. फलोत्पादन

भाजी (प्रति किलो) बाजार भाव (₹) फलोत्पादन दर (₹)
टोमॅटो ८० ५३
कांदा ५० २८
बटाटा ५० ३१
वालपापडी १२० ६० (निम्मे दर)
भेंडी ८० ६१
कोबी ५० ३६

इतर महत्त्वाचे दर (बाजार भाव)

आले (Ginger): १६० रु./किलो (२० रु. वाढ)
शेवगा: १६० रु./किलो
फ्लॉवर: ६० रु./किलो
गाजर/गवार: ८० रु./किलो

दिलासा आणि नवी आवक

  • 🥥 नारळ स्वस्त : लहान नारळ ३० रुपये, तर मोठा नारळ ४०-५० रुपयांना उपलब्ध.
  • 🥭 कैऱ्या दाखल : स्थानिक कैऱ्या १०० रुपयांना ४ नग, तर तोतापुरी १२० रुपये किलो.
  • 🌿 पालेभाज्या : मेथी/शेपू २५ रु. जुडी, पालक १५ रु., कोथिंबीर २० रु. जुडी.
#Goa #VegetablePrices #Inflation #PanajiMarket #HorticultureGoa #MonsoonEffect
हेही वाचा