दिग्गज अभिनेते धर्मेंद्र कालवश; ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिनेसृष्टीवर शोककळा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र कालवश; ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : सिने सृष्टीवर अधिराज्य गाजवलेले दिग्गज अभिनेते, ही - मॅन (He - Man) धर्मेंद्र (८९ वर्षे) (Bollywood’s legendary actor Dharmendra) यांनी आज शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने (Passes away) सिनेसृष्टीतील एक पर्व संपले. धर्मेंद्र  यांचे निधन.

सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘धरमवीर’ अशा असंख्य हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर दु:खाचे सावट पसरले आहे.

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर, १९३५ साली पंजाब येथे झाला. पुढील महिन्यात ते ९० वर्षांचे होणार होते. त्यांनी ३०० पेक्षा जास्त सिनेमात काम केले. त्यातील कित्येक सिनेमा सुपरहिट ठरले. 

१९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमातून चित्रपटनगरीत प्रवेश केला. ६० च्या दशकात ‘मिलन की बेला’, फूल और पत्थर’, ‘आए दिन बहार के’ या सिनेमातून त्यांना खूप लोकप्र‌ियता मिळाली.

त्यानंतर मागे वळून न पाहता अनेक सिनेमात काम केले व सुपर स्टार बनले. त्यांना भारतातील  ही - मॅन संबोधले जात होते.  धर्मेंद्र यांनी ६०, ७० व ८० च्या दशकात आंखे, शिकार, आया सावन झूम के, जीवन मृत्यु, मेरा गांव मेरा देश, सीता और गीता, राजा जानी, जुगनू, यादों की बारात, दोस्त, शोले, प्रतिज्ञा, चरस, धरम वीर, गुलामी, हुकूमत, आग ही आग, ऐलान ए जंग, व तहलका इत्यादी सिनेमात काम केले.

१९९० च्या दशकात काही सफल सिनेमात चरित्र अभिनेता म्हणून दिसले. त्यात ‘प्यार किया तो डरना क्या’, लाइफ इन ए... मेट्रो, अपने, जॉनी गद्दार, यमला पगला दीवाना या सिनेमांचा समावेश होता. काही वर्षांनंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या सिनेमात दिसून आले.

१९९७ साली बॉलीवुड मधील योगदानाबद्दल त्यांना फिल्मफेयर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार प्राप्त झाला. 

बीकानेरचे होते खासदार

भारताच्या १५ व्या लोकसभेचे खासदार होते. राजस्थान येथील बीकानेर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उमेदवारीवर निवडून आले होते. 

हेमा मालिनीशी केले दुसरे लग्न 

वैयक्तीक जीवनाविषयी सांगायचे झाल्यास धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी पहिले लग्न केले. त्यातून त्यांना चार मुले आहेत. दोन मुली व दोन मुलगे. सनी देओल व बॉबी देओल हे त्यांचे मुलगे सुपरस्टार आहेत. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनीशी दुसरे लग्न केले. दुसरे लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. हेमा मालिनीपासून त्यांना मुली ईशा देओल व अहाना देओल या दोन मुली आहेत. 

हेही वाचा