श्री संस्थान पर्तगाळी जीवोत्तम तीर्थ मठाची सार्ध पंचशताब्दी

पैंगीण : श्री संस्थान पर्तगाळी जीवोत्तम तीर्थ मठाच्या (Shri sansthan Partagali Jivottam Tirth Math) ५५० व्या सार्ध पंचशताब्दी (550th Panchshatabdi) निमित्त २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी असेल.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वा. काणकोणचे सुपुत्र आणि गोव्यातील एक सुप्रसिद्ध गायक कलाकार डॉ. प्रवीण गावकर (Dr. Pravin Gaonkar) आणि साथी कलाकारांचा 'स्वर झंकार' हा प्रभू श्रीराम आणि वीर विठ्ठल दर्शनाच्या अनुभूतीकडे नेणारा मराठी आणि हिंदी भक्ती गीतांचा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात डॉ. प्रवीण गावकर यांच्यासह ७६ सहकारी कलाकार सहभागी होणार आहेत. एका ठिकाणी ७७ फूट उंचीची भव्य व आकर्षक अशी श्री प्रभू रामाची प्रतीमा या ठिकाणी साकारत आहे. त्याच वेळी काणकोणचे सुपुत्र डॉ. प्रवीण गावकर ७६ कलाकारांच्या चमूसह कार्यक्रम सादर करणार आहेत.