पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये कोंबून अज्ञातांचे पलायन
फोंडा : मुळ राजस्थान येथील परंतु सध्या फोंडा येथे वास्तव्यास असलेल्या व्यावसायिकाचे अपहरण झाले आहे. पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला आहे.
ज्योफील नगर येथे वास्तव्यास असलेले संदीप चौधरी (३८) हे नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघालेले होते. ते कार्यालयात पोहोचल्यानंतर पांढऱ्या कारमधून आलेल्यांनी त्यांना आपल्या गाडीत कोंबले व पसार झाले. अपहरण घडताना संदीपचे सहाय्यक बाजूलाच होते. त्यांनी आरडाओरड करून त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
आपल्या मालकाचे अपहरण झाले हे लक्षात येताच ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी तत्काळ फोंडा पोलीस स्थानक गाठले व तक्रार दाखल केली. एका व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची तक्रार येताच उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी लगेचच कामाला लागले. संध्याकाळी साडेतीन ते सात साडेसातपर्यंत फोंडा पोलीस स्थानकावर चांगलीच हलचल सुरू होती.