देशात नक्की चाल्लयं काय? सोनम राजा रघुवंशीनंतर पुन्हा एक जोडपं बेपत्ता

सिक्कीममध्ये हनिमूनसाठी गेलेलं जोडपं नदीत कोसळल्याचा संशय

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
10th June, 01:04 pm
देशात नक्की चाल्लयं काय? सोनम राजा रघुवंशीनंतर पुन्हा एक जोडपं बेपत्ता

प्रतापगढः संपूर्ण देशात गाजणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडामागे राजाची पत्नी सोनम हिचा हात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या हत्येचा सूत्रधार खुद्द त्याची पत्नी सोनम रघुवंशी असल्याचे तिने पोलिसांसमोर कबूल केले आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, मुख्य आरोपी सोनमला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इंदूरचा रहिवासी आणि सोनमचा प्रियकर राज कुशवाह, तसेच विशाल चौहान आणि आकाश राजपूत यांचा समावेश आहे.

राजा रघुवंशी हत्याकांडाचा तपास सुरू असताना दुसरीकडे आणखी एक जोडपं सिक्कीमला हनिमूनला गेले असता तिथेच बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. दरम्यान या जोडप्याच्या बेपत्ता होण्याच्या बातमीनंतर दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी सिक्कीम गाठलं आहे.

या घचटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातील रहिवासी कौशलेंद्र प्रताप सिंह आणि अंकिता सिंह यांचा विवाह ५ मे रोजी पार पडला होता. २४ मे रोजी हे दोघे सिक्कीमला हनिमूनसाठी गेले होते. दरम्यान २९ मे रोजी तिथे भूस्खलनाच्या घटना घडल्या असून कौशलेंद्र आणि अंकिताची कार मंगन जिल्ह्यातील तिस्ता नदीपात्रात एक हजार फूट खोलवर कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. सध्या बचाव पथक त्यांचा शोध घेत आहेत. मात्र या वृत्ताबाबत अधिकृत माहिती मिळाली नसून कुटुंबियांनी थेट सिक्कीम गाठले आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा