बार्देशः आमदार लोबोंना सुनावणीस हजर राहण्याचे जीसीझेडएमएचे निर्देश

वागातोर कथित बेकायदा बांधकाम प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd March, 12:02 am
बार्देशः आमदार लोबोंना सुनावणीस हजर राहण्याचे जीसीझेडएमएचे निर्देश

म्हापसा : वागातोर येथील अविकसित क्षेत्रामध्ये कथित बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या मुद्यावर गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना येत्या २५ मार्च रोजी सर्व कागदपत्रांसह जीसीझेडएमएमया कार्यालयात वैयक्तिक सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. 

याप्रकरणी हणजूण मधील ग्रामस्थांनी जीसीझेडएमएकडे तक्रार केली होती. सर्वे क्रमांक ३५४/१ मधील मायकल लोबो यांच्या मालकीच्या मालमत्तेत अविकसित क्षेत्रात समुद्र पातळीपासून ५० मीटरच्या आत कथित बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचा दावा, या तक्रारीत करण्यात आला होता. 

त्यानुसार, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने पाहणी केली होती. तसेच कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर गेल्या दि. ७ मार्च रोजी लोबो यांनी निवेदन सादर करत जमिनीवरील संरचना काढून जागा साफ करण्यात आल्याचे नमूद केले होते. 

नंतर अधिकाऱ्यांना जागेची पडताळणी केली आणि जीसीझेडएमएचे सदस्य सचिव सचिन देसाई यांनी २५ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता कागदपत्रांसह पक्षकारांना वैयक्तिक सुनावणीसाठी हजर राहण्याची निर्देश दिले आहे.               

हेही वाचा