पणजी : मिरामार येथील 'ओशानिया' इमारतीच्या फ्लॅटमध्ये लागली आग

तब्बल चार बंब वापरुन अखेर अग्निशामक दलाने आगीवर मिळवले नियंत्रण. 'या' मुळे लागली आग

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
22nd March, 04:24 pm
पणजी : मिरामार येथील 'ओशानिया' इमारतीच्या फ्लॅटमध्ये लागली आग

पणजी : मिरामार, पणजी येथे व्हि. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाजवळ असलेल्या 'ओशानिया' या इमारतीमधील गच्चीवर असलेल्या एका फ्लॅटला आग लागली. स्थानिकांनी अग्निशामक दलास याबाबत माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

नेमके प्रकरण काय ? 

आज शनिवार, २२ मार्च रोजी दुपारी २.११ बाजता मिरामार येथे आग लागल्याचे पणजी अग्निशामक दलास समजले. त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून पाण्याची फवारणी सुरू केली. आगीचे स्वरूप पाहता त्यांनी पणजी मुख्यालयातील दलाची मदत घेतली. दरम्यान काहीवेळाने म्हापसा आणि पिळर्ण अग्निशामक दलास देखील पाचारण करण्यात आले. चार बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. 

हाती आलेल्या एका माहितीनुसार , व्हि. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाजवळ असलेल्या 'ओशानिया' या इमारतीमधील गच्चीला आग लागली. या इमारतीच्या गच्चीवर एक व्हेल्डींग वर्कशॉप कार्यरत आहे. ठिणगी पडून बाजूलाच असलेल्या फ्लॅटला आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी या फ्लॅटमध्ये जात परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत पाहणी केली. कायदेशीर सोपस्कार पार पाडत पुढील कारवाईला मूर्तस्वरूप दिले जाईल. मालमत्तेच्या नुकसानीचा आकडा लवकरच हाती येईल. 


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा