गुजरातमधील रहस्यमय विहीर; पाण्याच्या अनोख्या हालचालीने ग्रामस्थ चक्रावले

तज्ज्ञांच्या निष्कर्षाकडे लक्ष

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th August, 12:25 pm
गुजरातमधील रहस्यमय विहीर; पाण्याच्या अनोख्या हालचालीने ग्रामस्थ चक्रावले
 मोरबी  : गुजरातच्या मोरबी तालुक्यातील वीरपरडा गावातील एक रहस्यमय विहीर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. (Gujarat's Mystery Well Moves On Its Own Again, Villagers Left Stunned). गुरुवारी दुपारी या विहिरीतील पाणी कोणताही बाह्य हस्तक्षेप नसताना स्वतःहून हलताना दिसल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य आणि उत्सुकता निर्माण झाली.
स्थानिकांच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास विहिरीतील पाण्याची हालचाल पुन्हा सुरू झाली. यापूर्वीही दोन दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. काही काळ पाण्याची हालचाल थांबल्यानंतर गुरुवारी पुन्हा ती सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
ही अनोखी घटना पाहण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी विहिरीजवळ गर्दी केली. पाण्याची सतत होत असलेली हालचाल नेमकी कशामुळे होत आहे, याबाबत मात्र अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
काही स्थानिकांच्या मते, मोरबी परिसर भूकंपीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने या घटनेचा संबंध भूगर्भातील हालचालींशी असू शकतो. मात्र, याबाबत तज्ज्ञांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
तज्ज्ञांच्या निष्कर्षाकडे लक्ष 
या रहस्यमय घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.  विहिरीतील पाण्याच्या या अनाकलनीय हालचालीमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी आता सर्वांचे लक्ष तज्ज्ञांच्या तपासाकडे लागले आहे.
हेही वाचा
सर्व पहा