पाहणीनंतर कला अकादमी बंद करण्याविषयी होणार निर्णय

पणजी : दुरुस्तीनंतर कला अकादमीच्या (Kala Academy, Goa) कामात १८ ठिकाणी दोष असल्याचा अहवाल तज्ज्ञ कृती दल संघाने दिल्यानंतर कला अकादमीची आता पुन्हा दुरुस्ती होणार. आयआयटी मद्रास ही संस्था दुरुस्ती कामाचा अंदाज सादर करणार. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खाते आणि इतर तज्ज्ञांच्या माध्यमातून उद्या १६ तारखेपासून अकादमीची पाहणी होणार. कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांनी ही माहिती दिली.
कला अकादमीच्या दुरुस्ती विषयी अंदाज आयआयटी मद्रास ही संस्था सादर करणार. अंदाज सादर केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत निविदा जारी करणार. केवळ बांधकाम दुरुस्ती विषयीचा अंदाज आयआयटी मंद्रास संस्था सादर करणार. साऊंड, लायटींग विषयी इतर तज्ज्ञ अंदाज सादर करतील.
दुरुस्तीसाठी प्रथम दिनानाथ मंगेशकर सभागृह बंद ठेवणार. इतर विभाग सुरू असणार. कधीपासून आणि किती दिवस अकादमी बंद राहणार हे पाहणीनंतर ठरणार. तज्ज्ञामार्फत पाहणी केल्यानंतर पुढील सोपस्कार ठरणार, असे कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.