फादर बोलमॅक्स परेरा यांचे पार्थ‌िव चिखली येथे अंतिम दर्शनासाठी; प्रार्थना सुरू

अनेकांकडून श्रद्धांजली,

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 hours ago
फादर बोलमॅक्स परेरा यांचे पार्थ‌िव चिखली येथे अंतिम दर्शनासाठी; प्रार्थना सुरू

वास्को : ह्रदयविकाराच्या झटक्याने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात  मंगळवारी पहाटे निधन झालेले गोव्यातील पर्यावरण कार्यकर्ते फादर बोलमॅक्स यांचे पार्थ‌िव चिखली येथील चर्चमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. याठिकाणी प्रार्थनाही सुरू आहे.  अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. चिखली येथील चर्चमध्ये भेट देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


त्यात कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, दक्षिण गोवा जिल्ह्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, माजीमंत्री जुझे फिलीप डिसोझा, माजी आमदार फ्रांसिस सिल्वेरा, फादर इरीमितो,  उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश फेर्द‌िन रिबेलो,  एल्वीस गोम्स,  प्रा. प्रजल साखरदांडे यांचा समावेश होता. 

गोव्यातील पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी कसोशिने झटणारा एक सच्चा कार्यकर्ता गमावल्याची भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे अशी प्रार्थना केली.

आज दुपारी केपे येथे अंत्यसंस्कार  

दरम्यान, फादर बोलमॅक्स परेरा यांच्या पार्थ‌िवावर आज गुरुवारी केपे येथील ‘होली क्रॉस’ चर्चमध्ये दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी केपे येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

हेही वाचा