६२ वर्षीय संशयिताला अटक

मडगाव : बोर्डा-फातोर्डा येथील एका दुकानात खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी संशयित तिबुर्शिओ मोंतेरो याला अटक केली आहे. संशयिताने मुलीसमोर अश्लील चाळे केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फातोर्डा पोलिसांनी शुक्रवारी तिबुर्शिओ मोंतेरो (६२, रा. तिवरे-ओरगाव, फोंडा) याला ताब्यात घेतले. ही घटना २६ मार्च रोजी बोर्डा येथील एका दुकानात घडली होती. पीडित मुलगी खरेदीचे बिल भरत असताना, संशयिताने तिच्यासमोर अश्लील वर्तन केले.
याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता , पोक्सो कायदा आणि गोवा बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. फातोर्डा पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.