सांताक्रुझचे माजी सरपंच इनास परेरा यांचा आरोप

पणजीः सांताक्रुझच्या (Santa Cruz) बोंडवळ तळ्यासाठी (Bondvel Lake) एनआयओने (NIO) ५ लाख चौ.मी. प्रभावित परिसचर सूचवला होता. पण सरकारने प्रत्ययक्षात केवळ १ लाख चौ. मी. प्रभावित परिसर अधिसूचीत केला. बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी हा प्रकार केला, असा आरोप सांताक्रुझचे माजी सरंपच इनास परेरा यांनी केला.
आझाद मैदानावर (Azad maidan) घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना परेरा यांनी सांगितले की, बोंडवळ तळ्याजवळ येऊ घातलेली मोठी बांधकामे रोखून तळ्याचा प्रभावीत परिसर राखून ठेवणे हा आमचा मुद्दा आहे. वर्ष २०२२ मध्ये बोंडवळ परिसर पाणलोट क्षेत्र जाहीर करण्यापूर्वी सरकारने सीएसआयआर-एनआयओ
आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची (Pollution control Board) एक एजन्सी नियुक्त केली होती. तीन एजन्सींच्या मदतीने एनआयओने एक तपशीलवार दस्ताऐवज तयार केला होता. आणि त्या दस्ताऐवजात एनआयओने ५०.५७ हेक्टर हा तळ्यासाठी प्रभावित परिसर असावा; अशी सूचना केली होती; अशी माहिती परेरा यांनी दिली.
५०.५७ हेक्टर या हिशोबाने तळ्याचा प्रभावित परिसर ५.७० लाख चौ. मी. एवढा ठेवण्यास सांगितले होते. पण कुठल्या शहाण्याने केवळ १ लाख चौ. मी. प्रभावीत परिसर ठेवला आहे. अतिरिक्त चार लाख चौ. मी. प्रभावित परिसर बाहेर काढून एक अधिकृत गुन्हा केला आहे. अधिकारी आणि बिल्डर लॉबी मध्ये संगनमत आहे, असा आरोप परेरा यांनी केला.
जर पू्र्वीच ५ लाख चौ. मी. प्रभावीत परिसर अधिसूचित केला असता तर सर्व बांधकामे येणे बंद झाली असती. आणि तळे राहिले असते. तळे वाचवण्यासाठी आमदार, मंत्र्यांच्या दारी धावण्याची आम्हाला गरज भासली नसती. या सूचना कशाला अंमलात आणल्या नाहीत याचा जाब विचारण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंद करणार, असा इशारा परेरा यांनी दिला.