शेतकरी, स्वयंसहाय्य गटांना कर्ज लवकर आणि सहज मिळण्याची व्यवस्था हवी :मुख्यमंत्री डॉ. सावंत

कर्जातून साधनसुविधा आणि रोजगारनिर्मिती व्हावी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
52 mins ago
शेतकरी, स्वयंसहाय्य गटांना कर्ज लवकर आणि सहज मिळण्याची व्यवस्था हवी :मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी : शेतकरी (Farmer), महिला (Women), युवक (Youth) आणि स्वयंसहाय्य गटांना लवकर आणि सहज कर्ज मिळावे म्हणून नाबार्ड (NABARD))  तसेच बॅंकांनी (Bank) व्यवस्था तयार करावी, असे आवाहन मुख्यमंत्री (Chief Minister)  डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.  नाबार्ड आयोजीत कर्ज आधारीत परिसंवादाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचीव डॉ. कांडावेलू तसेच नाबार्ड आणि बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते. 

कर्जाचा शेतकरी, स्वयंसहाय्य गट यांना मालमत्ता तसेच भांडवल तयार करण्यासाठी मदत व्हायला हवी. मालमत्ता आणि भांडवलातून युवक, शेतकरी आणि महिलांनी रोजगाराच्या संधी तयार करायला हव्यात.  यासाठी कर्जाचा उपयोग रोजगार नि‌र्म‌ितीत होण्याची गरज आहे. यासाठी नाबार्ड तसेच इतर बॅंकांनी शेतकरी, स्वयंसहाय्य गट तसेच महिलांना सवलती आणि सहज कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

शेती, मासेमारी यांसाठी बऱ्याच योजना आहेत. या योजना कर्जाचा भक्कम पाठिंबा मिळाल्यास शेती, मासेमारी परिसराचा विकास होणार. रोजगार संधी तयार होणार आणि गोवा स्वंयपूर्ण होण्यास मदत होणार. गोवा हे केवळ पर्यटनावर विसंबून रहायला नको. शेती, मासेमारी आणि सहकार क्षेत्रात ते आघाडीचे स्थान व्हायला हवे. मासे तसेच शेतीच्या उत्पादनाच्या निर्यातीची देखील मोठी संधी आहे. यातून उद्योजक तयार होणार. यासाठी भविष्यात नाबार्ड तसेच इतर बॅंकांचा पाठिंबा आणि सहकार्य महत्त्वाचे ठरणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 


हेही वाचा