बेरोजगारी, महागाईविरोधात युवक काँग्रेसचा पणजीत मोर्चा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
बेरोजगारी, महागाईविरोधात युवक काँग्रेसचा पणजीत मोर्चा

पणजी : जब जब सीएम डरता है, पोलीस (Police) को आगे करता है, जिंदाबाद, जिंदाबाद, युथ काँग्रेस जिंदाबाद... अशा घोषणा देत युवक काँग्रेसने (Youth Congress) आज बेरोजगारी व महागाईविरोधात पणजीत (Panjim) मोर्चा काढला. आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाण्यासाठी निघालेला मोर्चा पोलिसांनी पणजीत रोखला. स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काँग्रेस विधीमंडळ नेते युरी आलेमाव, पक्षाच्या सहप्रभारी अंजली निंबाळकर, आल्तिन गोम्स, युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक व इतर कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

पणजीत मिनेझिस ब्रागांझा सभागृहाजवळ मोर्चास सुरवात झाल्यानंतर काही अंतरावरच पोलिसांनी मोर्चा रोखला. मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा उपस्थित होता. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृतत्वाखालील सरकार हुकुमशाही मार्गाने काम करत असून सर्वत्र दादागिरी सुरू आहे. बेरोजगारी वाढत असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. शांततापूर्ण स्वरूपाचा हा मोर्चा पोलिसांनी दादागिरीच्या मार्गाने रोखला. लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने निषेध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हा अधिकारही गोव्यात नसल्याचे यावेळी युरी आलेमाव म्हणाले. 

गोव्यात आज महिला सुरक्षित नाहीत. बेरोजगारी वाढत आहे. महिला सुरक्षित नाहीत त्याची मोर्चा रोखणाऱ्या महिला पोलिसांना लाज वाटायला हवी, असे अंजली निंबाळकर यावेळी म्हणाल्या. युवक काँग्रेसच्या अधिकारग्रहण सोहळ्यानंतर दुपारी बेरोजगारीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा