वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील भंगारअड्ड्याला मुद्दामहून लावली आग; एकजण अटकेत

पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघड.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील भंगारअड्ड्याला मुद्दामहून लावली आग; एकजण अटकेत

पणजी : गोव्यातील (Goa) वेर्णा औद्योगिक वसाहतीत (Verna Industrial Estate)  भंगारअड्ड्याला (Scrapyard) लागलेल्या आगप्रकरणी वेर्णा पोलिसांनी रिजायल मुस्तफा (केळशी, कुठ्ठाळी) याला अटक केली आहे. या आगीत सुमारे २०.५ लाख रुपयांची हानी झाली होती. त्याने मुद्दामहून ही आग लावल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

यासंदर्भात दवर्लीतील शरीफ हसन यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, डिसेंबर १२ रोजी दुपारी १२ ते १ दरम्यान भंगारअडड्यांना मुद्दामहून आग लावल्याचे म्हटले होते. त्यात आपल्या व असिफ शेख, अतिक शेख व सहिद निझामी मिळून चारजणांच्या भंगारअड्ड्यांची हानी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आगीत आपले ५० हजार रुपयांचे तर इतर तीन भंगारअड्ड्यांच्या मालकांचे २० लाख रुपयांची हानी झाल्याचे म्हटले आहे. या तक्रारीनंतर वेर्णा पोलिसांनी 

रिजायल मुस्तफा याला अटक केली आहे. याप्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रामचंद्र नाईक वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. 


हेही वाचा