जिल्हा पंचायत निवडणूक; उत्तरेत १११ तर दक्षिणेत ११५ उमेदवार रिंगणात

उत्तरेत धारगळमध्ये सर्वाधिक ७ उमेदवार, दक्षिणेत साकवाळ येथे सर्वाधिक ८ उमेदवार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
11th December, 05:38 pm
जिल्हा पंचायत निवडणूक; उत्तरेत १११ तर दक्षिणेत ११५ उमेदवार रिंगणात

पणजी : गोव्यात (Goa) २० डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी (Zilla Panchayat Election) उत्तर गोव्यात (North Goa) १११ तर दक्षिण गोव्यात (South Goa)  ११५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उत्तर व दक्षिण गोवा मिळून एकूण ५० जागांसाठी २२६ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे येत्या २० डिसेंबर रोजी ५० मतदारसंघांतील मतदार २२६ उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरला आहे. मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षाचे सर्व मंत्री, आमदार प्रचारात उतरले आहेत. भाजप - मगो युतीसह काँग्रेस, आप, आरजी, गोवा फॉरवर्ड या पक्षांच्या उमेदवारांमुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. २० डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उत्तर व दक्षिण गोव्यातून प्रत्येकी ४७ अर्ज मागे घेण्यात आले. बुधवारी १० रोजी अर्जांची छाननी झाल्यानंतर उत्तरेत १५८ तर दक्षिणेत १६२ अर्ज ग्राह्य ठरले होते. आज गुरूवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. उत्तरेचा विचार करता धारगळ मतदारसंघात सर्वाधिक ७ उमेदवार आहेत. इतर मतदारसंघांत ४,५,६ असे उमेदवार आहेत.दक्षिण गोव्याचा विचार करता सांकवाळ मतदारसंघात सर्वाधिक ८ उमेदवार आहेत.









हेही वाचा