हडफडे दुर्घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात; वागातोरचा प्रसिद्ध 'गोया' नाइटक्लब सील!

क्लबच्या काही महत्त्वाच्या परवान्यांमध्ये त्रुटी असल्याचे समोर आल्यानंतर झाली कारवाई.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th December, 05:14 pm
हडफडे दुर्घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात; वागातोरचा प्रसिद्ध 'गोया' नाइटक्लब सील!

पणजी: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबमधील भीषण अग्नितांडवानंतर (Arpora Fire Tragedy) गोवा सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लब्सविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, वागातोर (Vagator) येथील प्रसिद्ध 'गोया' (Goya) नाइटक्लब आज (गुरुवारी) संयुक्त अंमलबजावणी समितीने पूर्णपणे सील केला आहे.



कबीर शिरगावकर यांच्या नेतृत्त्वाखालील या समितीने वागातोर येथे धडक कारवाई केली. समितीमध्ये कबीर शिरगावकर (वरिष्ठ नागरी सेवा अधिकारी), कार्यकारी अभियंता XXII, पीडब्ल्यूडी-मडगाव, निखिल पालेकर (पोलीस निरीक्षक, एस्कॉर्ट सेल), सुशील मोरसकर (स्टेशन फायर ऑफिसर), आणि आशिष राजपूत (कार्यकारी अभियंता, डिव्हिजन XIV, वेर्णा) यांचा समावेश होता. ही समिती बार्देश तालुक्यातील किनारी भागासाठी नियुक्त करण्यात आली आहे. समितीच्या निर्देशानुसार बार्देशचे मामलेदार यांनी क्लबला टाळे ठोकले.  



मिळालेल्या माहितीनुसार, कुळाच्या जमिनीत क्लबची उभारणी करणे तसेच क्लबच्या काही महत्त्वाच्या परवान्यांमध्ये त्रुटी (discrepancies in certain permissions) आढळल्यामुळे समितीने हा कडक निर्णय घेतला आहे. हडफडे येथील दुर्घटनेनंतर सरकारने क्लब्सच्या सुरक्षा आणि परवान्यांची कसून तपासणी सुरू केली आहे, याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा