लोकसभेत दिली माहिती

पणजी : गेल्या तीन वर्षांत गोव्यात (Goa) रस्त्यावरील अपघातांची (Road accident) संख्या कमी होत आहे. वर्ष २०२२ च्या तुलनेत २०२४ मध्ये ३०० पेक्षा कमी अपघातांची नोंद झाली आहे. अपघात कमी करण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले असल्याची माहिती केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत दिली.
लोकसभत दिलेल्या लेखी उत्तरातील आकडेवारीनुसार, वर्ष २०२० ते २०२२ पर्यंत रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात वाढत होत होती. मात्र, २०२३ मध्ये अपघातांची आकडेवारी हळू हळू कमी होऊ लागली.
२०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये ६३६ अपघातांच्या वाढीची नोंद झाली होती. मात्र, मागील तीन वर्षांत वाढत असलेल्या अपघातांचा आकडा अर्ध्या पेक्षा कमी होऊन वर्ष २०२२ च्या तुलनेत २०२४ मध्ये ३२९ एवढ्या अपघातांची नोंद झाली. वर्ष २०२१ मध्ये रस्त्यांवरील अपघातात ४७४ एवढी वाढ झाली होती. २०२२ मध्ये अपघातांचा आकडा १६२ एवढा वाढला. मात्र, २०२३ मध्ये अपघातांचा आकडा १६५ पर्यंत उतरला. आणि २०२४ मध्ये अपघातांचा आकडा १६४ एवढा कमी झाला. केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे अपघातांची संख्या कमी होत आहे. त्यात वाहतुकी विषयी जागृती, रस्त्यांच्या ‘इंजिनियरींग’ मध्ये केलेली सुधारणा, वाहनांच्या इंजिनयरींग मध्ये केलेली सुधारणा, कायद्याची कठोर अंमलबजावरी व आपत्कालीन खबरदारी यांचा समावेश आहे.
राज्यातील अपघातांचा आकडा
वर्ष अपघात
2020 2,375
2021 2,849
2022 3,011
2023 2,846
2024 2682