पणजीत १२ ते २१ डिसेंबर दरम्यान सेरेंडिपिटी महोत्सवाचे आयोजन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
09th December, 02:55 pm
पणजीत १२ ते २१ डिसेंबर दरम्यान सेरेंडिपिटी महोत्सवाचे आयोजन

पणजी : पणजीत (Panjim) १२ ते २१ डिसेंबर दरम्यान सेरेंडिपिटी महोत्सवाचे (Serendipity Festival) आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या महोत्सवात गोवा (Goa), राष्ट्रीय (National)  तसेच जगभरातील हजारहून अधिक कलाकार २५० पेक्षा व अधिक कलाकृतींचे प्रदर्शन करणार आहेत. महोत्सवात दृश्य कला, नृत्य, संगीत, नाट्य, डिझाइन आणि पाककृती आदी कलांचा समावेश असल्याचे सेरेंडिपिटी महोत्वाच्या संचालक स्मृती राजगढिया यांनी सांगितले. मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महोत्सवातील अन्य क्युरेटर उपस्थित होते. 

महोत्सवादरम्यान पणजीत विविध ठिकाणी ५०० हून अधिक इव्हेंटचा अनुभव घेता येणार आहे. यामध्ये प्रकल्पांचे प्रदर्शन, पॅनल चर्चासत्रे, कार्यशाळा, आणि सार्वजनिक कला प्रदर्शन यांचा समावेश असेल.

यंदा या महोत्सवाचे पणजीतील दहावे वर्ष आहे. 

त्यामुळे यावर्षीचा महोत्सव अधिक समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल. महोत्सवात कलाप्रेमींना अर्थपूर्ण चर्चांद्वारे एकत्र आणणे, कलेला अधिक सुलभ करणे तसेच संस्मरणीय अनुभव देण्यात येईल.  

हा महोत्सव पणजीतील आर्ट पार्क, जूने गोमेकॉ परिसर, ईएसजी इमारत, सांता मोनिका जेटी, कला अकादमी, आझाद मैदान, करंझाळे समुद्र किनारा, बंदर कप्तान जेटी, जूने गोवा येथे होईल. महोत्सवात ३५ तज्ञ वेगवेगळ्या कलाप्रकारांचे क्युरेटिंग करत आहेत.  यंदा लिलेट दुबे, एहसान नूरानी, झुबिन बालापोरिया, गीता चंद्रन, अंजना सोमानी, सुदर्शन शेट्टी, राहाब अल्लाना, अनीश प्रधान, मनु चंद्रा,  रणजीत होस्कोटे, संदीप संगरू, अनुराधा कपूर आधी क्युरेटर म्हणून काम पाहतील असे स्मृती राजगढिया यांनी सांगितले.


हेही वाचा