मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : व्याघ्र क्षेत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीने जो अहवाल दिला आहे, तो सरकाराकडे अद्याप पोहोचलेला नाही. अहवाल मिळाल्यानंतर सरकार आढावा घेऊन कार्यवाहीविषयी भूमिका निश्चित करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केेले. सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीने व्याघ्र क्षेत्राविषयी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला. नेत्रावळी, खोतीगावसह भगवान महावीर अभयारण्य आणि भगवान महावीर पार्कचा समावेश अहवालात आहे. सांगेचे आमदार आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यानंतर काणकोणचे आमदार तथा मंत्री रमेश तवडकर यांनीही व्याघ्रक्षेत्राला विरोध दर्शवला आहे. खोतीगाव अभयारण्यात वाघ नसताना त्याचा समावेश व्याघ्रक्षेत्रात कसा करता येईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असेही मंत्री तवडकर यांनी सांगितले.