शिक्षण संचालनालयाने भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात मागवला अहवाल

शिक्षण संस्थांना १७ नोव्हेंबर पर्यंत द्यावा लागणार अहवाल

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
शिक्षण संचालनालयाने भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात मागवला अहवाल

पणजी: गोव्यातील (Goa) शैक्षणिक संस्था, शालेय (School) परिसरात भटक्या कुत्र्यांना (stray Dogs) नियंत्रित करण्यासाठी सध्या काय उपाययोजना केल्या जात आहेत याचा स्थिती अहवाल शिक्षण विभागाने मागवला आहे. शिक्षण संचालक (Director of Education)  शैलेश झिंगडे यांनी १७ नोव्हेंबरपर्यंत सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  ७ नोव्हेंबर रोजी कुत्र्यांसंदर्भातील याचिकेवर देशातील सर्व शैक्षणिक संस्था म्हणजेच शाळा, महाविद्यालयांना परिसरातील कुत्र्यांच्या हालचाली रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर शिक्षण संचालनालयाने एक परिपत्रक जारी करून सर्व प्राथमिक, सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना भटक्या कुत्र्यांना शाळेच्या परिसरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे, शाळांभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

शिक्षण संचालनालयाने कुत्र्यांना नियंत्रित करण्यासाठी शाळांना उपलब्ध असलेल्या सुविधा आणि उपक्रमांच्या सद्यस्थितीचा अहवाल मागवला आहे. त्यांना गुगल फॉर्मद्वारे शाळा व्यवस्थापन सुविधा आणि उपक्रमांची माहिती प्रविष्ट करण्यास सांगितले आहे.

या फॉर्ममध्ये शाळा आणि तालुक्याचे नाव समाविष्ट करणे,  शाळांनी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्याचे नाव आणि मोबाईल नंबर, कुत्र्यांना शाळेच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा जसे की कुंपण, भिंती, दरवाजे. तसेच प्राण्यांची हाताळणी, कुत्रा चावल्यास प्रथमोपचार आणि कुत्रा चावल्यास जागरूकता यासंदर्भात माहिती देण्यास सांगितले आहे. 


हेही वाचा