एका आयएएस अधिकारी, वरिष्ठ अभियंत्याला दिले १७.६८ कोटी रुपये : पूजा नाईक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13 mins ago
एका आयएएस अधिकारी, वरिष्ठ अभियंत्याला दिले १७.६८ कोटी रुपये : पूजा नाईक

पणजी : गोव्यातील सरकारी नोकरीतील ‘जॉब स्कॅम’संदर्भात (Goa Job scam) पूजा नाईकने पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. २०१९ च्या मेगा भरती दरम्यान एका आयएएस अधिकारी (IAS Officer)  आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) एका वरिष्ठ अभियंत्याला (Senior (Engineer) १७.६८ कोटी (16.68 crore rupees)  रुपये देण्यात आले होते. ते ६१३ (613 Candidate)  उमेदवारांकडून वसूल करण्यात आले होते.

एका वरिष्ठ मंत्र्याच्या इशाऱ्यावर हे काम करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांकडे असल्याचा गंभीर आरोप पूजा नाईक (Pooja NaiK) याने केला आहे.

आप संघटक अमित पालेकर यांच्यासह पूजा नाईकने हा खुलासा केला. एका प्रादेशीक पक्षाच्या कार्यालयात नोकरी करताना आपण पैसे घेऊन नोकऱ्या दिल्याचे पूजा याने सांगितले.   

२०१९ मध्ये जेव्हा मेगा भरतीची घोषणा झाली तेव्हा एका वरिष्ठ मंत्र्याने एक आयएएस अधिकारी व एका वरिष्ठ अभियंत्याला नोकऱ्या देण्यास सांगितले होते.  आपण १७.६८ कोटी रुपये तसेच ६१३ अर्ज या दोघांकडे पाठवले होते.  ते पैसे परत करावेत, अशी आपली मागणी असल्याचे पूजा नाईक यांनी सांगितले. 

 पोलिसांना दिलेल्या जबानीत आपण या दोन अधिकाऱ्यांची नावे सांगितली होती. मंत्र्याचे नाव घेतले नव्हते. पर्वरी फ्लॅटमध्ये या दोघांना पैसे दिले होते.  पण आता पोलिस म्हणतात की तिथे फ्लॅट नाही तर एक शिक्षण संस्था आहे. मुख्यमंत्र्यांचा त्यात कसलाही हात नसल्याचे पूजाने स्पष्ट केले.

पैसे घेऊन ८० जणांना दिल्या नोकऱ्या

आपण यापूर्वी पैसे घेऊन ८० हून अधिक जणांना नोकरी दिली आहे. परंतु २०१९ ते २०२२ दरम्यान झालेल्या मेगा नोकरी भरतीमध्ये, मी पैसे घेतलेल्या एकाही उमेदवाराला नोकरी मिळाळी नाही. आमची नऊ जणांची टीम असून, सर्वांना बरोबर अटक झाली होती.  आपण त्यांना सत्य काय ते सांगण्यासाठी बोलावले होते. मात्र, ते आले नाहीत. आपलेच १७ कोटी रुपये वसूल व्हायचे आहेत. बाकीच्यांचे किती पैसे अडकले आहेत ते माहित नसल्याचे पूजाने स्पष्ट केले.  

पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत

पैसे दिल्याचे सर्व पुरावे आपल्या मोबाईलवर आहेत. दोन व्हिडीओ असलेला आपला एक मोबाईल डिचोली पोलीस स्थानकात यापूर्वीच जप्त केला आहे. यासंदर्भात डिचोली पोलिसांना विचारल्यावर त्यांनी म्हार्दोळ पोलिसांना पाठवल्याचे सांगितले. मात्र, अजून तो मोबाईल आपल्याला मिळाला नसल्याचा दावाही पूजा याने केला आहे. 


हेही वाचा