अखेर न्याय : ३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ९० वर्षीय शिक्षकाला मिळणार पेन्शन

पेन्शनरी फायदे देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 mins ago
अखेर न्याय : ३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ९० वर्षीय शिक्षकाला मिळणार पेन्शन

पणजी : गोव्यातील (Goa) एका शिक्षकाला (Teacher)  अखेर ३५ वर्षांहून अधिक काळ लढा दिल्यानंतर न्याय मिळाला. ९० वर्षीय निवृत्त शिक्षक (90 year old Teacher) दतात्रय बाबाराव आंबेकर यांना अखेर त्यांचे हक्काचे पेन्शन मिळणार आहे.

गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाने (Mubai High Court, Goa) राज्य सरकारला त्यांचे पेन्शनरी फायदे तात्काळ वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

 १९८८ पासूनच्या प्रक्रियेतील त्रुटींमुळे पेन्शन अडकले होते. 

न्यायाधीश सारंग कोतवाल आणि आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, आंबेकर निलंबित असताना आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जात असताना नवीन पेन्शन योजनेसाठी पर्यायी फॉर्म सादर करू शकले नसल्याने रोखण्यात आले होते. निलंबन नंतर न्यायालायाने रद्द केले होते, त्यामुळे त्यांना सेवा लाभ मिळणे गरजेचे आहे. 

अधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्याने पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनरी फायद्यांसाठी आपला पर्याय दिला आहे असे मानले पाहिजे, असे न्यायालयाने नमुद केले आहे. 

आंबेकर यांना शाळेकडून इतर देयकांमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल शिक्षण संचालनालयाशी संपर्क साधण्याची परवानगी दिली आणि अशा कोणत्याही निवेदनावर त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याला शिक्षण संचालकांसमोर योग्य निवेदन करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

हेही वाचा