
पणजी : गोव्यातील (Goa) (फातर्पा (Fatorpa) येथील श्री शांतादुर्गा भूमिपुरुष सप्तकोटेश्वर संस्थातनचा (Shri Shantadurga Fatarpekarin Bhumipurush Saptkoteshwar Sausthan) नौकाविहार (सांगोड) (Naukavihar) उत्सव रविवारी रात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

एकूण भक्तीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उत्सवात दिव्यांच्या प्रकाशात परिसर तेजोमय बनला.

दुपारी वनभोजन (आवळे भोजन) पार पडले. संध्याकाळी घुमट आरती झाली. त्यानंतर रात्री श्रींचा तळीत नौकाविहार पार पडला.

श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवी व श्री सप्तकोटेश्वर देवाला पालखीत बसवून तळीजवळ आणण्यात आले. त्यानंतर नौकेत बसवून नौकाविहार झाला.

यावेळी तळीच्या भोवती मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. पणत्या, दिव्यांनी भाविकांनी श्रींची ओवाळणी केली. भजन, घुमट, शमेळ वादनात मोठ्या उत्साहात नौकाविहार संपन्न झाला.