कॉकपीटमध्ये धूर, इमर्जन्सी लँडिंग

प्रवाशांना सायंकाळी ४.१५ वाजता दुसरे विमान उपलब्ध करून देण्यात आले


24th November 2017, 03:09 am
नवी दिल्ली : दिल्लीहून विशाखापट्टणमसाठी उड्डाण केलेले इंडिगो कंपनीच्या विमानाच्या कॉकपीटमध्ये धूर निघू लागल्याने या विमानाचे पुन्हा दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात यावेळी १७० प्रवासी होते. या घटनेमध्ये कुठलेही नुकसान झाले नसले तरी धूर कशामुळे येत होता, हे समजू शकलेले नाही. बुधवारी उड्डाण केलेल्या विमानात हा प्रकार घडला होता. या घटनेसाठी इंडिगोकडून इमर्जन्सी घोषित करण्यात आली नव्हती. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून ती घोषित करण्यात आली होती. विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर ही इमर्जन्सी मागे घेण्यात आली. विमानातील प्रवाशांना सायंकाळी ४.१५ वाजता दुसरे विमान उपलब्ध करून देण्यात आले.