ब्राह्मोसची चाचणी यशस्वी

जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रुज मिसाईल


23rd November 2017, 02:17 am
नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारे सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसची बुधवारी भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३०एमकेआय या जेट विमानावरून यशस्वी चाचणी बंगालच्या उपसागरात करण्यात आली. सुमारे अडीच टन वजनाचे हे क्षेपणास्त्र आहे.
आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, भारताने पहिल्यांदाच जेट विमानाचा अशा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन इतिहास घडवला.
ब्राह्मोसने यशस्वीरित्या लक्ष्यावर मारा केला. यापूर्वी ब्राह्मोसची टेस्ट जमिनीवरून आणि वॉरशिपद्वारे करण्यात आली आहे. ब्राह्मोस जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रुज मिसाइल आहे. त्याचा वेग २.८-३.० मॅक (३६७५-३४३० केएमपीएच) आहे. अगदी योग्य निशाण्यावर लागत असल्याने याला 'मारा करा आणि विसरून जा' क्षेपणास्त्रही म्हटले जाते.