चेकबुक रद्द करण्याचा प्रस्ताव नाही : अर्थ मंत्रालय

चेकबुक व्यवहारात कायम राहणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.


24th November 2017, 03:06 am
नवी दिल्ली : देशात बँकिंग व्यवहारात चेकबुक राहणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी केंद्र सरकार चेकद्वारे होणारे व्यवहार रद्द करणार असल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थ मंत्रालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारचा पुढील सर्जिकल स्ट्राइक धनादेश (चेक) व्यवहारातून बाद करून होईल, असा कयास अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयटी) व्यक्त केला होता. नोटाबंदीनंतर केंद्र सरकार सातत्याने ऑनलाइन व्यवहारांवर भर देत आहे. डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढावे, यासाठी अनेक आकर्षक योजनाही आखण्यात आल्या होत्या. चेकबुक व्यवहारात कायम राहणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.