निवडणूक चिन्ह पलानीसामी गटाकडे

शशिकला यांच्या गटाला मोठा झटका


24th November 2017, 03:05 am
चेन्नई : दोन गटात विभागलेल्या अण्णाद्रमुक पक्षातील व्ही. के. शशिकला यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला. झाडाच्या दोन पानांचे पक्षाचे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांच्या गटाकडेच राहील, असे निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर पलानीसामी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
भाजपसोबत जवळीक वाढत असल्याचा आरोप पलानीसामी यांच्यावर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा फायदा मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा आरोप चुकीचा असल्याचे पलानीसामी यांनी म्हटले आहे. पक्षाचे बहुतांश आमदार, खासदार आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत, असा दावा त्यांनी केला.