पीडब्ल्यूडी मंत्री दिगंबर कामत यांनी स्वीकारला पदभार

खात्याच्या पहिल्याच बैठकीत दिले खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd September, 12:21 pm
पीडब्ल्यूडी मंत्री दिगंबर कामत यांनी स्वीकारला पदभार

पणजी : गोव्याचे नवे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्याच बैठकीत राज्यातील रस्त्यांच्या स्थितीवर आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याबाबत तसेच रस्त्यांच्या देखभालीच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची आणि तत्सम धोकादायक ठिकाणांची माहिती जमवून त्यावर प्राधान्याने काम केले जाईल. अभियंत्यांना अशा रस्त्यांची त्वरित यादी तयार करण्यास सांगितले आहे. मला एक-दोन महिन्यांचा अवधी द्या, त्यानंतर जनतेला बदल दिसून येईल. जिथे इच्छाशक्ती असते, तिथे मार्ग नक्की मिळतो’, हेच माझे तत्त्व आहे, असेही ते म्हणाले.

पीडब्ल्यूडी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच घेतलेल्या या पहिल्या आढावा बैठकीत त्यांनी रस्त्यांच्या खड्ड्यांबाबतच्या सार्वजनिक तक्रारींवर लक्ष केंद्रित केले. आगामी काळात पायाभूत सुविधांत सुधारणा आणि नागरिकांच्या अडचणींना वेळेत उत्तर देणे याला प्राधान्य असेल असे कामत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा