🕌सुमारे दोन-अडीच शतकांपूर्वी मराठ्यांनी देशाचा चेहरा बदलून टाकला. मराठ्यांनी हिंदवी स्वराज्याची विजयी पताका अटकेपार फडकवली. काल पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होतेय की काय असेच वाटले. बलूचिस्तानमधील बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारे मीर यार बलुच यांनी बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केली.
यामुळे येत्या काळात पाकिस्तानची शकले पडणार हे मात्र निश्चित, पण यातून घडणाऱ्या घडामोडींमुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणांची गुंतागुंत अधिकच किचकट होणार आहे. यात देखील मराठेच महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ते कसे ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला इतिहासात डोकावून पहावे लागेल.
⚔️ बलुचिस्तानमधील मराठा आणि त्यांची कहाणी :
१७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांना अफगाण शासक अहमदशाह अब्दालीकडून पराभव स्वीकारावा लागला. या युद्धात हजारो मराठा सैनिक आणि नागरिकांना बंदी बनवले गेले. त्यातील सुमारे २२ हजार मराठा युद्धकैद्यांना अब्दालीने बलुचिस्तानमधील डेरा बुगती येथील बलुच शासकाला भेट स्वरूपात दिले.
अब्दालीच्या मदतीला युद्धात सहभागी झालेल्या बलुच जमातींना हे युद्धकैदी भेटस्वरूपात दिले गेले. मीर नासीर खान नूरीने या युद्धकैद्यांना बुग्टी, मर्री, मझारी, गुरचानी, रींद आणि रायसानी अशा वेगवेगळ्या जमातीत विभागले.
🌾 नवीन जीवनाची सुरुवात
सुरुवातीला गुलाम म्हणून ठेवण्यात आलेले या हरहुन्नरी मराठ्यांनी पुढे बलुचिस्तानच्या कठीण भूभागात शेती करत, तग धरला आणि तेथेच स्थायिक झाले.
🕊️ सांस्कृतिक वारसा
जरी त्यांनी नंतर इस्लाम धर्म स्वीकारला, तरी ते मराठी संस्कृती विसरले नाही. आजही 'बुग्टी मराठा' समाजात मराठी प्रथा पाळल्या जातात.
🎭 मराठी परंपरा आजही जिवंत
📚 ऐतिहासिक संदर्भ
या समाजाचा उल्लेख ब्रिटिश लेखिका सिल्व्हिया मॅथेसन यांच्या 'Tigers of Balochistan' या पुस्तकातही झाला आहे.९० च्या दशकातील 'तिरंगा' चित्रपटात नाना पाटेकरने म्हटलेले – 'मै मराठा हूं… और मराठा मरता नहीं, मराठा मारता है' – हे वाक्य ऐकून बलुचिस्तानात थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला होता.
बलुचिस्तानमधील मराठा वंशजांनी अनेक दशकांपासून सामाजिक आणि राजकीय अन्याय सहन केला आहे. त्यांना जबरदस्तीने धर्मांतरित करण्यात आले, त्यांच्या जमिनी काढून घेतल्या गेल्या, आणि त्यांना दुय्यम नागरिक म्हणून वागवले गेले. तरीही त्यांनी हिम्मत सोडली नाही.
आज अनेक मराठा वंशजांनी शिक्षण, पेट्रोलियम, आणि मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. आज हजारो किलोमीटर दूर, पाकिस्तानमधील कठीण भौगोलिक परिस्थितीतही आपली मराठी ओळख जपणाऱ्या या बुग्टी मराठा समाजाला मानाचा मुजरा करावाच लागेल.