२१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान तामिळनाडू येथे आयोजन
पणजी : शोलिंगूर, तामिळनाडू येथे होणाऱ्या ३५व्या फेडरेशन कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याच्या पुरुष व महिलांचा संघ निवडण्यात आला आहे. ही स्पर्धा २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
निवडण्यात आलेला गोव्याचा क्रिकेट संघ
पुरुष संघ : हर्ष गाला, पुनित खांडेपारकर. आकाश लमाणी, शोएब अंसारी, मारुती पाटील, प्रज्ञेश गावकर, रौनक नाईक, सौरभ नाईक, प्रितेश नाईक, चिन्मय केरकर, पार्थ नागरादले, सिद्धांत गावस, अमिश नाईक, साहिल गावडे.
महिला संघ : सिद्धी च्यारी, पूर्वा गावडे, दिव्या सतरकर, संचिता शेटगावकर, यशिता गावडे, खुशी पालकर, शांती ताते, सानिक गावकर, दीक्षा गावडे, चैत्राली मिस्त्री, दिव्या तळागे, सानिया झोरे, सलोनी सतरकर, तमन्ना धुळपकर.
निवडण्यात आलेल्या दोन्ही संघांना मंगळवारी फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये निरोप देण्यात आला. यावेळी प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडा प्रमोटर केतन भाटीकर, उद्योजक हिम्मत मालविय, क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाचे झेडएसओ शैलेश नाईक, जीटीबीसीए सदस्य सचिन सुखटणकर, सामाजिक कार्यकर्ते शुभम नार्वेकर, जीटीबीसीए सदस्य कीर्तन वैझ आणि प्रशिक्षक नीलेश नाईक, हरेश पार्सेकर आणि अजिंक्य नाईक यांची उपस्थिती होती.
(फोटो)
फेडरेशन कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघासोबत प्रमुख पाहुणे.