२ जनरेटर आणि १ ट्रान्सफॉर्मर जळून खाक, सुमारे २८ लाखांचे नुकसान. आग नियंत्रणात
पणजी : आश्वे-मांद्रे येथे आजोबा देवस्थानच्या जवळच असलेल्या 'टॅन सँड' रिसॉर्टच्या समोर असलेल्या जनरेटर रूमध्ये आज सकाळी ९.३०च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात २ जनरेटर आणि १ ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी, वीज खात्याचे कर्मचारी आणि मांद्रे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. या घटनेत सुमारे २८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बातमी अपडेट होत आहे.