जीपीएससी/यूपीएससी मुलाखत कशी द्यावी

खूपदा विद्यार्थ्याचे छंद या प्रकारापासून चर्चा सुरु होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्याने इंप्रेशन मारायला तसे लिहिले आहे, की त्यात खरंच त्याला रुची आहे आणि त्याच्या रुचीच्या गोष्टी तो कितपत मनापासून जपतो व त्यात त्याला कसा आनंद मिळतो हे पण तपासले जाते.

Story: यशस्वी भव: |
16th February, 12:07 am
जीपीएससी/यूपीएससी  मुलाखत कशी द्यावी

यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला दिल्लीतील यूपीएससी हेडक्वार्टर्स येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना असे बोलावण्यात आले नसेल त्या विद्यार्थ्यांनी समजून जावे की परत त्यांना आता नवीन कॅलेंडर वर्षात प्रिलियम व मेन्स या परीक्षा उत्तीर्ण व्हायची तयारी करावी लागणार आहे. येथे एकदा मेन्स परीक्षा पास झालो, आता काम फत्ते झाले असे मानून चालत नाही, हा पर्सनलीटी टेस्ट एक गडावरचा बालेकिल्ला असतो. खालून गड सर करणे म्हणजे प्रिलियम. परत पुढे चढाई करून त्याच दमाने तटबंदी भेदून किल्ला जिंकणे म्हणजे मेन्स परीक्षा व पुढे त्याच दमात सर्वात कठीण बालेकिल्ला जिंकणे म्हणजे पर्सन्यालिटी टेस्ट अर्थात इंटरव्यूह. 

हे सर्व जसे एका दमात करावे लागते तसेच हे टप्पे एकाच कॅलेंडर वर्षात पार करावे लागतात. ढोलकपूर येथे यूपीएससी हेड क्वार्टर आहे. यामध्ये एक पॅनल असते जे उमेद‌वाराला साधारणपणे ४५ मिनिटे ते १ तास प्रश्न विचारते. ही चाचणी गप्पा गोष्टींच्या स्वरूपातून सुरु होते व जसे जसे विषय येत जातील तशी तशी आपली मते, सहाय्यकारी मते, विरुद्ध मते, तटस्थ मते, बॅलन्स बिहेविअर, प्रामाणिकपणा, प्रशासकीय गुण, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, विषयाचे आकलन, त्याची खोली, मॉरॅलीटीही तपासली जाते. स्मरणशक्ती, जुन्या घडलेल्या परंतु आवश्यक तपशील, अधिकाऱ्यांचे निर्णय, त्यावेळची परिस्थिती, हतबलता यावर सुध्दा मत प्रदर्शन करावे लागते. 

खूपदा विद्यार्थ्याचे छंद या प्रकारापासून चर्चा सुरु होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्याने इंप्रेशन मारायला तसे लिहिले आहे, की त्यात खरंच त्याला रुची आहे आणि त्याच्या रुचीच्या गोष्टी तो कितपत मनापासून जपतो व त्यात त्याला कसा आनंद मिळतो हे पण तपासले जाते. यामुळे जर विद्यार्थ्याने प्रामाणिकपणा बाळगला तर मुलाखतीमध्ये फायदा होतो म्हणजे होतोच. आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे द्यायलाच हवे आहे हा अट्टाहास सोडावा. ज्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल, अथवा सत्यतेबद्दल खात्री नसेल तर तेथे प्रामाणिकपणे माहिती पूर्ण नाही किंवा “क्षमस्व, मला खरंच माहिती नाही.” किंवा “मला यातील गोष्टी जाणून घेऊन मगच उत्तर देणे पर्याप्त आहे.” अश्या प्रकारची वागणूक प्रशंसनीय असते. कारण कमिशनला 'गुगल'वाला अधिकारी नको असतो. तो एक 'स्टेट्समन' पद्धतीचा हवा असतो. जो धोरणी असू शकतो, फायदा - तोट्याचा विचार करणारा, सारासार विचार करुन पब्लिक पॉलिसीचा विचार करणारा एक 'माणूस' हवा असतो. 

अश्या मुलाखतीमधून ते उमेदवारातील माणूस शोधतात. जीपीएससी परीक्षेमध्ये सध्यातरी क्लास A व क्लास B लाच पॅनेल मुलाखत होते. ज्युनिअर स्केल ऑफिसर, सबरजिस्ट्रार तसेच बीडीओ, असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर या पदांसाठी दीर्घकालीन मुलाखत होते. अर्थात सर्व पोस्टसाठी मुलाखत होतेच. या मुलाखतीची तयारी आधीपासून नीट करता येते.


अॅड. शैलेश कुलकर्णी,
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)