फोंडा : धक्कादायक ! गवाणे - बांदोड्याच्या जंगलात आढळला मानवी सांगाडा

परिसरात खळबळ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th February, 02:54 pm
फोंडा : धक्कादायक ! गवाणे - बांदोड्याच्या जंगलात आढळला मानवी सांगाडा

पणजी : फोंडा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गवाणे -बांदोडा येथील जंगलात  मानवी सांगाडा आढळून आल्याने येथे खळबळ माजली आहे. दरम्यान स्थानिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर फोंडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर फोंडा पोलिसांकडून सांगाड्याची ओळख पटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

दरम्यान हाती आलेल्या अन्य एका माहितीनुसार, गावणे भागातील एक युवक ३१ ऑक्टोबर २०२४ पासून बेपत्ता होता. पोलिसांनी या आणि अनेक मार्गांनी तपासचक्रे गतिमान केली आहेत. ही आत्महत्या, दुर्घटना की थंड डोक्याने केलेला खून हे शोधण्याचा देखील पोलीस सध्या प्रयत्न करत आहेत. 

बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा